JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / ‘कोणी काम देता का काम’; दंगल फेम फातिमा कोरोनामुळं झाली बेरोजगार

‘कोणी काम देता का काम’; दंगल फेम फातिमा कोरोनामुळं झाली बेरोजगार

आमिर खानच्या चित्रपटातील अभिनेत्री कामाच्या शोधात; बेरोजगारीमुळं घरातच काढतेय दिवस

0110

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाचा मोठा फटका भारतीय मनोरंजनसृष्टीला देखील बसला आहे.

जाहिरात
0210

लॉकडाउन, सिनेमागृह बंद असणं आणि आर्थिक टंचाईमुळं अनेक निर्मात्यांनी आपले प्रोजेक्ट लांबणीवर तरी टाकले किंवा काळी काळासाठी रद्द तरी केले.

जाहिरात
0310

याचा थेट फटका अनेक कलाकारांना बसू लागला आहे. कोरोनामुळं भारतीय मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित कलाकार सध्या बेरोजगार होऊन घरातच बसले आहेत.

जाहिरात
0410

या बेरोजगार कलाकारांच्या यादीत दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख देखील आहे. सध्या ती सुद्धा कामाच्या शोधात असून कोणीतरी तिला काम द्यावं अशी विनंती करतेय.

जाहिरात
0510

फतीताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती कुठल्याशा वृत्तमाध्यमाला मुलाखत देताना दिसत आहे.

जाहिरात
0610

या मुलाखतीत तिला तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत विचारण्यात आलं. परंतु तिनं कुठलाही नवा प्रोजेक्ट नसल्याचं मान्य केलं.

जाहिरात
0710

ती म्हणाली, “सध्या मी घरातच बसले आहे. माझ्याकडे कुठलंही काम नाही. निर्मात्यांना फोन करुन काम मागतेय. आता कदाचित कोरोना संपल्यावर माझी बेरोजगारी दूर होऊ शकेल.”

जाहिरात
0810

फातिमा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं इश्क आणि चाची 420 यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0910

त्यानंतर दंगल, लुडो, ठग्स ऑफ हिंदुस्तान, आकाश वाणी, सुरज पें मंगल भारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

जाहिरात
1010

अलिकडेच फातिमा अजिब दास्ता या शॉर्ट फिल्ममध्ये झळकली होती. ही फिल्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या