JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्याने खळबळ

उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्याने खळबळ

यूपीची संपूर्ण विधानसभा उडवण्यासाठी 500 ग्रॅम पीइटीएन पुरेसं आहे त्यामुळेच हा सर्वच प्रकार अत्यंत गंभीर मानला जातोय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनौ, 14 जुलै : उत्तर प्रदेश विधानसभेत पीईटीएन या अत्यंत घातक प्रकारातली स्फोटकं आढळून आल्यानं मोठी खळबळ उडालीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलीय, या प्रकरणाची एनआयए मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. बुधवारी समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे यांच्या आसनाखाली एका पाकिटामध्ये हे स्फोटक पदार्थ सापडले होते. त्याचं वजन 150 ग्रॅम इतकं आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात या स्फोटक पदार्थाचे नाव पीइटीएन (PETN) असल्याचे निष्पन्न झाले आहे. यूपीची संपूर्ण विधानसभा उडवण्यासाठी 500 ग्रॅम पीइटीएन पुरेसं आहे त्यामुळेच हा सर्वच प्रकार अत्यंत गंभीर मानला जातोय. ज्याने कुणी ही स्फोटकं ठेवण्याचा कट रचला आहे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. शिवाय, या घटनेच्या निषेधार्थ प्रस्ताव विधानसभेत आणण्याचं योगींनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना आवाहन केलं. या प्रकरणानंतर विरोधीपक्षातील नेत्यांनी उत्तप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. “जर विधानसभेत विरोधीपक्षातील नेत्यांच्या खुर्चीखाली स्फोटकं सापडत असतील तर, उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दशा काय असेल याचा फक्त विचार करा,” असे मत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद व्यक्त केले. ‘पीईटीएन’ स्फोटकं काय आहेत? पीईटीएन अत्यंत धोकादायक स्फोटकं मानली जातात. ही गंधहीन स्फोटकं सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागणं अत्यंत कठीण असतं. किंबहुना, प्रशिक्षित कुत्र्यांनाही सापडत नाहीत. मेटल डिटेक्टरही या स्फोटकांना पकडू शकत नाही. कमी प्रमाणातील पीईटीएनचा स्फोट मात्र अत्यंत मोठा होतो. लष्कर आणि खाण उद्योगासाठी या स्फोटकांचा वापर केला जातो. तेही विशिष्ट परिस्थितीतच याचा वापर होतो. अशा एकंदतरीत स्थितीत उत्तर प्रदेश विधानसभेत ही स्फोटकं पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या