ठाणे, 04 जानेवारी : ठाणे (Thane) जिल्ह्याच्या डोंबिवलीमध्ये एका 66 वर्षीय महिलेने इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एसपी आहेर यांनी सांगितले की, ठाकूरली येथील ओम मंगल कैलास इमारतीच्या तिसर्या मजल्यावर राहणाऱ्या रुक्मिणी पिल्लई यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री साडेसहाच्या सुमारास त्या गच्चीवर गेल्या आणि तेथून उडी मारून आत्महत्या केली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पिल्लई हे गेल्या 10 वर्षांपासून आजारी होत्या आणि त्या नैराश्यात होत्या. त्यातूनच रुक्मिणी यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रुक्मिणी यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. डोंबिवली पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रुक्मिणी यांच्या हत्येमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा संशय, पतीने पत्नीला दिलं पेटवून गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर इथं घडली आहे. या घटनेत महिला 75 टक्के भाजली असून सध्या रुग्णालयाच तिच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीला पेटवणारा नराधम पती फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी इथं राहणाऱ्या आत्माराम पवार याने पत्नी सुमन पवार हिच्यावर चारित्र्याचा संशय घेतला. पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध आहेत, असा त्याचा आरोप होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत असत. चालक असलेल्या आत्माराम पवार याला दारूचं व्यसनही होतं. गुरुवारी रात्री सुमन पवार या घरी स्वयंपाक बनवत होत्या. त्यावेळी आरोपी आत्माराम हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर चारित्र्याचा संशय घेत त्याने पत्नीसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच या भांडणाने टोक गाठलं. हे सगळं सहन न झाल्याने सुमन पवार यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. दारूच्या नशेत असलेल्या आत्मारामने त्यांच्या अंगावर काडीपेटीतील काडी पेटवून टाकली. यामध्ये सुमन पवार या 75 टक्के भाजल्या आहेत. त्यानंतर सुमन पवार यांना उपचारासाठी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, पवार दाम्पत्याला 3 मुलं आहेत. घरात घडलेल्या या प्रकारामुळे ही चिमुकली आता उघड्यावर पडली आहेत.