JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / राष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही?,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी

राष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही?,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी

दिल्लीत खरगे यांच्या निवासस्थानी राज्यातील काँग्रेस प्रमुख नेत्यांची बैठक झाली यांत नाराजीचा सूर उमटला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 जून : काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जून खरगे याच्या उपस्थित झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या उदासीन कार्यपद्धतीवर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस नेते आक्रमक पद्धतीने राज्यांत फिरतात पण दुसरीकडे काँग्रेस पक्ष मात्र शांत आहे यांवर नाराजीचा सूर प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत खरगे यांच्यासमोर काही नेत्यांनी मांडला. दिल्लीत खरगे यांच्या निवासस्थानी राज्यातील काँग्रेस प्रमुख नेत्यांची बैठक झाली यांत नाराजीचा सूर उमटला.  राष्ट्रवादी भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणूक जिंकते, विधान परिषदेची कोकण जागा जिंकते पण दुसरीकडे याच निवडणुकीत काँग्रेस पराभव होतो हे राज्यांत चांगले चित्र जात नाही असा नाराजीचा सूर लावला. राज्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय काँग्रेस शिबीर घेत आहे अशा शिबिरातून फारसे प्रभाव साध्य होत नाही त्याऐवजी आक्रमक आंदोलन केली पाहिजे असा सूर काही काँग्रेस नेत्यांनी लगावला. एकाबाजूला राष्ट्रवादी महाआघाडी होऊ शकत नाही असं सांगते तर पर्यायांचा ही विचार आतापासून केला पाहिजे असं मत ही काही नेत्यांनी या बैठकीत मांडल्याचं समजतंय. विधान परिषद लागलेल्या दोन जागा निवडणूक उमेदवारीबाबत ही पुढील दोन तीन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल असे समजतंय. हेही वाचा मुंबई - पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने पत्नीला 50 लाखांना लुटले! तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या …अन्यथा 16 जुलैपासून मुंबईला दूध बंद करू,राजू शेट्टींचा इशारा 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या