JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Miss You: 'या' क्रिकेटपटूंनी पूर्ण केलं आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पण...

Miss You: 'या' क्रिकेटपटूंनी पूर्ण केलं आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पण...

आज फादर्स डे. यानिमित्तानं आम्ही तुम्हाला काही क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या स्वर्गीय वडिलांची स्वप्नं पूर्ण केली आणि क्रिकेटमध्ये यशस्वी शिखरावर पोहचले. मात्र त्यांचे हे यश पाहायला, वडील नाहीत याचे शल्य कायम या खेळाडूंनी बोलून दाखवलं. यात सगळ्यात प्रथम येतो तो मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. 1999 वर्ल्ड कपनंतर सचिनच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या वडिलांना अखेरचं पाहण्यासाठी सचिन इंग्लंडवरून आला आणि तीन दिवसांनी पुन्हा मैदानावर परतला. मैदानावर येताच त्यानं शतकी खेळी.

0106

आज फादर्स डे. यानिमित्तानं आम्ही तुम्हाला काही क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या स्वर्गीय वडिलांची स्वप्नं पूर्ण केली आणि क्रिकेटमध्ये यशस्वी शिखरावर पोहचले. मात्र त्यांचे हे यश पाहायला, वडील नाहीत याचे शल्य कायम या खेळाडूंनी बोलून दाखवलं.

जाहिरात
0206

यात सगळ्यात प्रथम येतो तो मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. 1999 वर्ल्ड कपनंतर सचिनच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या वडिलांना अखेरचं पाहण्यासाठी सचिन इंग्लंडवरून आला आणि तीन दिवसांनी पुन्हा मैदानावर परतला. मैदानावर येताच त्यानं शतकी खेळी. यानंतर त्यानं आकाशाकडे बघून आपल्या बाबांना ही खेळी समर्पित केली.

जाहिरात
0306

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या कारर्किदीच्या सर्वोत्तम शिखरावर आहे. मात्र त्याचं हे यश पाहण्याआधीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. क्रिकेट सामना सुरू असतानाच बाबांच्या निधनाची बातमी आली, तेव्हा तो कोसळला गेला. मात्र त्यानंतर मैदानात परतल्यावर त्यांनं अशी काही खेळी की आजही सर्वांच्या लक्षात आहे.

जाहिरात
0406

विराटप्रमाणेच भारतीय संघाचा खेळाडू ऋषभ पंत यांच्या वडिलांचे निधन आयपीएल दरम्यान झाले. ऋषभ आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करून टीमध्ये सामिल झाला होता. त्यानंतर त्यानं शानदार खेळी करत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

जाहिरात
0506

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा हिरो ठरलेल्या अथर्व अंकोलेकर जेव्हा 9 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. अथर्वच्या आईनं बेस्टमध्ये काम करून मुलाला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिलं. अखेर अंडर-19 संघात स्थान मिळवत अथर्वनं आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

जाहिरात
0606

कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज हनुमा विहारीच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तो 12 वर्षांचा होता. तेव्हाच त्यानं मनाशी निश्चय केला की, तो भारतीय संघाकडून खेळेल. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेलं पहिलं शतक आपल्या वडिलांना समर्पित केलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या