JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / विराटच्या निर्णयानंतर फॅन्सचा गांगुलीवर निशाणा, सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया

विराटच्या निर्णयानंतर फॅन्सचा गांगुलीवर निशाणा, सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया

विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडताच फॅन्सनी सोशल मीडियावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) निशाणा साधला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये पराभव झाल्यनंतर टेस्ट टीमची कॅप्टनसी ( Virat kohli quits test captaincy) सोडली आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे केले, आता कॅप्टनसी सोडण्याची वेळ आली आहे, असे त्याने सोशल मीडियावर जाहीर केले. विराटला 2014 साली टेस्ट टीमचा कॅप्टन करण्यात आले होते. त्याने टी20 टीमची कॅप्टनसी स्वत:हून सोडली होती. तर वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून त्याला हटवण्यात आले होते. आता विराटने टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडताच फॅन्सनी सोशल मीडियावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly)  निशाणा साधला आहे. ‘भारतीय क्रिकेटला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी 7 वर्ष कठोर मेहनत अथक प्रयत्न केले. मी माझं काम पूर्ण इमानदारीने केलं. एकाठिकाणी येऊन प्रत्येकाला थांबावं लागतं. माझ्यासाठीही आता टेस्ट कॅप्टन म्हणून वेळ आली आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण माझ्या प्रयत्नांमध्ये आणि आत्मविश्वासात कधीच कमी आलेली नाही. मी नेहमीच 120 टक्के देण्यावर विश्वास ठेवतो. मला जर काही गोष्टी करणं जमत नसेल, तर मला जाणवतं की हे करणं योग्य नाही. मी माझ्या टीमसाठी कधीच बेईमानी करणार नाही,’ असं विराट म्हणाला. त्याने या पोस्टमध्ये रवी शास्त्री आणि महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले. पण सौरव गांगुलीचं आणि राहुल द्रविडचं नाव घेतलं नाही. विराटनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट आणि गांगुली यांच्यातील मतभेद समोर आले होते. आता विराटने टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर सोशल मीडियावर फॅन्स गांगुलीला जोरदार ट्रोल करत आहेत.

गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा वाद सुरू आहे. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआदी त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विराटने कॅप्टनसी सोडल्यानंतर गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, कोहलीच्या भविष्याबद्दल म्हणाले…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या