JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Good News! 24 तासांत रिकव्हरी दरानं मोडले सगळे रॅकॉर्ड, 5 राज्यांत रुग्णसंख्या झाली कमी

Good News! 24 तासांत रिकव्हरी दरानं मोडले सगळे रॅकॉर्ड, 5 राज्यांत रुग्णसंख्या झाली कमी

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत 31,07,223 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड -19 च्या रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 77.23 टक्के झाला आहे.

0106

भारतात कोविड -19 च्या रुग्णांची संख्या अवघ्या 13 दिवसांत तब्बल 30 लाखांवरून 40 लाखांवर पोहोचली आहे. त्यात शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशात 86,432 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत 31,07,223 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड -19 च्या रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 77.23 टक्के झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -19 रूग्णांची एकूण संख्या 40,23,179 पर्यंत वाढली आहे.

जाहिरात
0206

गेल्या 24 तासांत 1,089 रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यात आतापर्यंत देशात एकूण 69,561 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या आकड्यांचा विचार केला तर रुग्णांची संख्या 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 21 दिवस लागले, तर 20 ते 30 लाख रूग्ण होण्यासाठी 16 दिवस लागले. अशात 30 लाख ते 40 लाखपर्यंत कोरोनाची संख्या पोहोचवण्यासाठी अवघ्या 13 दिवसांचा कालावधी लागला आहे. (AP Photo/Ajit Solanki)

जाहिरात
0306

कोविड -19 रूग्णांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचण्यासाठी 110 दिवस लागले होते तर संसर्ग झालेल्यांची संख्या एक लाख ते दहा लाख होण्यासाठी 59 दिवस लागले. अशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आता हा दर 1.73 टक्क्यांवर आला आहे. (AP Photo/Anupam Nath)

जाहिरात
0406

देशात सध्या कोरोनाच्या 8,46,395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 21.04 इतका याचा दर आहे.

जाहिरात
0506

आंध्र प्रदेश, बिहार, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या ठिकाणी रुग्णावाढीमध्ये घट झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 19,200 नवीन प्रकरणे नोंदली गेली. (AP Photo/Ajit Solanki)

जाहिरात
0606

तेलंगणामध्ये कोरोनाव्हायरसची 2511 नवीन प्रकरणं समोर आली आहेत तर 11 मृत्यूंची नोंद झाली आहे. (AP Photo/Ajit Solanki)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या