पीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

या महाशयांनी आपल्या बँकेचे शिपाई मनोज चव्हाण यांना महिलेकडे पाठवून पीक कर्ज तर देतोच शिवाय वेगळा पॅकेजही देतो असल्याचं सांगितलं.

Sachin Salve
बुलडाणा, 22 जून : पिक कर्ज वितरणाचा बोजवारा उडाला असताना एका बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीकडे पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना  बुलडाणा जिल्ह्यात घडलीये.मलकापूर तालुक्याच्या दाताळा गावातील सेन्ट्रल बँकेच्या शाखाधिकारी राजेश हिवसे असं या नराधमाचं नाव आहे.  पीक कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकरी दाम्पत्याकडून पीक कर्ज प्रकरणासाठी त्यांचा मोबाईल नंबर मिळवून फोनवर शेतकऱ्याच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी केली आहे.हा संतापजनक प्रकार एवढ्यावरच न थांबता या महाशयांनी आपल्या बँकेचे शिपाई मनोज चव्हाण यांना महिलेकडे पाठवून पीक कर्ज तर देतोच शिवाय वेगळा पॅकेजही देतो असल्याचं सांगितलं.

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!,डोळ्यात पाणी आणणारा एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा सदर गंभीर प्रकारामुळे पीडित महिला चांगलीच घाबरली असून या महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये शाखाधिकारी हिवसे आणि शिपाई चव्हाण यांच्या विरोधात तक्रात दाखल केली असून या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेची मोबाईल रेकॉर्डिंग हस्तगत करून दोन्ही आरोपी विरोधात विनयभंग तसंच अॅट्रोसिटीचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.'या' प्लास्टिकवर बंदी नाही!मात्र, आरोपींना अजून अटक करण्यात आली नसून आरोपी फरार असल्याचं कळतंय. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

Trending Now