JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पुणे : डोकेदुखी सांगून सासरच्यांनी दिली गर्भपाताची गोळी, मानपानाचा बदला घेण्यासाठी दिराकडूनही लगट

पुणे : डोकेदुखी सांगून सासरच्यांनी दिली गर्भपाताची गोळी, मानपानाचा बदला घेण्यासाठी दिराकडूनही लगट

लग्नात मान मिळाला नाही म्हणून विवाहित महिलेल्या सासरच्या लोकांनी जेवणात उदी टाकून बेडरुममध्ये मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेवून तिला भीती घातली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी, 20 ऑगस्ट : लग्न जुळल्यानंतर आजही अनेक जणांना मानपान हवा असतो. अनेक जण तर अवास्तव अपेक्षा ठेवतात. तसेच मान मिळाला नाही, तर त्यातून मग वाद करतात. किंवा त्याचा राग काढतात. पुण्यातून एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात आमचा मानपान पाहिजे तसा झाला नाही, अपेक्षेप्रमाणे सोनेही मिळाले नाही, या कारणावरून विवाहित तरुणीच्या सासरच्या लोकांनी तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केले. काय आहे संपूर्ण प्रकरण - लग्नात मान मिळाला नाही म्हणून विवाहित महिलेल्या सासरच्या लोकांनी जेवणात उदी टाकून बेडरुममध्ये मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेवून तिला भीती घातली. इतकेच नव्हे तर तिला डोकेदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी खायला दिली. ही घटना 11 नोव्हेंबर 2020 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधीत भोसरी येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच या तक्रारीवरुन पाच जणांवर कौटुंबिक छळ तसेच अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिराने केली लगट - लग्नात मान मिळाला नाही म्हणून नाही म्हणून महिलेसोबत वेगवेगळ्या प्रकारे तिला मानसिक त्रास देण्यात आला. तिच्यावर संशयही घेण्यात आला. तसेच एका खासगी व्यक्तिकडून तिच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. यानंतर त्यातील फोन नंबरवर फोन करुन या महिलेची बदनामी होईल, तसेच मनात लज्जा निर्माण होईल, अशा प्रकारे आरोपींनी संवाद केला. इतकेच नव्हे तर तिच्या दिरानेही तिच्याशी लगट करण्यात प्रत्यक केला. जेवणात टाकली उदी - लग्नात सासरच्यांना हवा तो मान मिळाला नाही, म्हणून विवाहितेच्या सासरच्यांनी तिला त्रास दिला. ती गर्भवती होती तेव्हा तिला डोकेदुखीची गोळी सांगून फसवले गेले आणि चक्क गर्भपाताची गोळी देण्यात आली. तसेच जादूटोणा करुन तिचा गर्भपात करण्याचा कटही आखण्यात आला. यानुसार फिर्यादी महिलेच्या जेवणामध्ये उदी टाकण्यात आली. इतकेच नव्हे तर तिच्या बेडरुममध्ये विविध ठिकाणी मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेवण्यात आल्या आणि तिच्या मनात भीती उत्पन्न करण्यात आली. हेही वाचा -  पुण्यात डेटिंग अॅपवरुन फसवणूक, तरुणीसोबत 50 वर्षाच्या व्यक्तीने ठेवले मनाविरुद्ध शारिरिक संबंध याप्रकरणी पीडित महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या