Nitin Raut यांची सोशल मीडियातील वादग्रस्त पोस्ट, Nitesh Rane यांनी ट्विट करत केला प्रहार
मुंबई, 22 ऑक्टोबर : काँग्रेसचे नते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत नितीन राऊत यांनी वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यांनी इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) काळातील दोन टपाल तिकीटं फेसबूकवर पोस्ट (Facebook Post) करत त्यावर कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवरुन भाजप आक्रमक झाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त पोस्टवरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये नितीन राऊत यांनी दोन टपाल तिकीटांचे फोटो पेस्ट केले आहेत. यामध्ये एका टपाल तिकीटावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो आहे त्याची किंमत 20 इतकी आहे तर दुसऱ्या तिकीटावर माकडाचा फोटो असून त्याची किंमत 100 इतकी आहे. इतकंच नाही तर ही पोस्ट करताना नितीन राऊत यांनी त्यावर लिहिलं, ‘इंदिरा गांधींच्या काळात ही टपाल तिकीटं छापण्यात आली होती. माकडाची किंमत पाच पटीने जास्त आहे.’ नितीन राऊत यांनी केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे खासतार नितेश राणे यांनी ट्विट करुन नितीन राऊतांवर हल्लाबोल केला आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियातही नितीन राऊत यांना ट्रोल करण्यात येत असून त्यांच्यावर टीका करण्यात येत असल्याचं पहायला मिळत आहे.
महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सावरकरांनी केली होती दया याचिका : राजनाथ सिंह याच महन्यात एका कार्यक्रमात भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक दावा केला होता. महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान तुरुंगात असताना ब्रिटीशांकडे दया याचिका केली होती. असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. ‘वीर सावरकर : द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. काय म्हणाले राजनाथ सिंह? राजनाथ सिंह म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेळोवेळी खोटं पसरविण्यात आले. वेळोवेळी असे सांगण्यात आले की, तुरुंगातून मुक्त होण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे दया याचिका केली पण महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन अंदमान तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे दया याचिका केली होती. सावरकरांच्या माफीनाम्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडत नाही तोच नितीन राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टने आता आता आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.