‘बिग बॉस मराठी 3’ मुळे स्नेहा वाघ ही अभिनेत्री प्रकाश झोतात आलेली पाहायला मिळाली. तिच्या नव्या फोटोशूटची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
हिंदी आणि मराठी मालिकेत आपली वेगळी अशी छाप सोडणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. 'बिग बॉस मराठी 3' मुळे स्नेहा अधिकच प्रकाश झोतात आलेली पाहायला मिळाली.
स्नेहाला बिगबॉस मधल्या खेळासोबत एका खास गोष्टीसाठी ओळखलं जातं ती म्हणजे तिची बिगबॉसला गुड मॉर्निंग म्हणायची पद्धत.
sarange असं म्हणून ती एक विशिष्ट ऍक्शन करायची ज्यावरून ती के-पॉप फॅन आहे का असा प्रश्नसुद्धा पडला होता. के-पॉपचा पर्पल रंगाशी जवळून संबंध असल्याने अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोखाली sarange लिहून तिचं कौतुक केलं आहे.
स्नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करत आली आहे.
स्नेहा कायमच एका भक्कम आणि खंबीर स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण राहिली आहे.स्नेहा नवीन कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचा मोठा चाहता वर्ग आहे.