JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Photos- बॉलिवूडच्या लव्हबर्ड्सनेही पाहिला ‘एवेंजर्स एंडगेम’

Photos- बॉलिवूडच्या लव्हबर्ड्सनेही पाहिला ‘एवेंजर्स एंडगेम’

‘द एवेंजर्स- एंडगेम’ची क्रेझ सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सारेच एवेंजर्सचे वेडे आहेत. बॉलिवूडचे लव्हबर्ड्सही याला अपवाद नाहीत.

0105

द एवेंजर्स- एंडगेमची क्रेझ सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सारेच एवेंजर्सचे वेडे आहेत. बॉलिवूडचे लव्हबर्ड्सही याला अपवाद नाहीत.

जाहिरात
0205

नुकतेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ‘एवेंजर्स एंडगेम’ पाहायला गेले होते. या दोघांशिवायही अनेक सेलिब्रिटींना पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहायचा मोह आवरला नाही.

जाहिरात
0305

लोअर परेल येथील थिएटरमध्ये दोघांना पाहण्यात आलं. यावेळी आलियाने फिकट निळ्या रंगाचा स्लिवलेस टॉप आणि जीन्स घातली होती. तर रणबीरही नेहमीप्रमाणे कॅज्युअलमध्येच दिसत होता. रणबीरने चेक्सचं शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम घातली होती.

जाहिरात
0405

विशेष म्हणजे रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी सिनेमात सुपरहिरोजच दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात ते सुपरहिरो असणार आहेत. त्यामुळे मोठ्या पडद्यावर एवेंजर्स पाहिल्यावर त्यांना ब्रह्मास्त्रमध्ये काय करायला हवं याचा अंदाज येईल.

जाहिरात
0505

या सिनेमाच्या तयारीसाठी आलिया आणि रणबीर भेटले असतानाच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यामुळे दोघांसाठी हा सिनेमा फार खास असेल यात काही वाद नाही. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या