कांचनजुरी, 9 ऑक्टोबर : जंगल परिसरातील रस्त्यांदरम्यान, प्राणी रस्ता ओलांडताना वाहनचालक आपले वाहन थांबवतात. तो प्राणी गेल्यानंतर मग वाहन मार्गक्रमण करतात. मात्र, आसाम राज्यातील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये भरधाव ट्रक आणि गेंड्यात जोरदार धडक झाली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना उद्यानाच्या हल्दीबारी रेंजमध्ये घडली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग 37 वर एक ट्रक जोरहाटहून गुवाहाटीकडे जात होता. हा ट्रक विरुद्ध दिशेने राष्ट्रीय महामार्ग ओलांडून राष्ट्रीय उद्यानात जात असलेल्या गेंड्यावर धडकला. पश्चिम बंगालची नोंदणी असलेला ट्रकने गेंड्याला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर हा गेंडा प्राणी काही अंतरावर फेकला गेला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
दरम्यान, बोकाखत येथे हा ट्रक पकडला असून गोलाघाट जिल्ह्यातील वन व वाहतूक विभागाने 9000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर ट्विटरवर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात सांगितले की, “गेंडे आमचे खास मित्र आहेत; आम्ही त्यांच्या जागेवर कोणतेही उल्लंघन होऊ देणार नाही. दरम्यान, वन विभागाकडून जबर जखमी झालेल्या गेंड्याचा शोध हत्तींच्या मदतीने सुरू आहे. हेही वाचा - धक्कादायक! विद्यार्थिंनींचे कपडे बदलताना व्हिडिओ CCTV मध्ये कैद, अशी आली घटना समोर हळदीबारी येथील या दुर्दैवी घटनेत सुदैवाने गेंडा वाचला आहे. मात्र, यानंतर वाहन अडवून दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, काझीरंगा येथे प्राणी वाचवण्याच्या आमच्या संकल्पानुसार आम्ही एका खास 32 किमीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरवर काम करत आहोत,” असेही ते म्हणाले. सरकारच्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एलिव्हेटेड कॉरिडॉरचा निर्णय घेण्यात आला.