JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ...आणि मंदिरातील तो फोटो ठरला शेवटचा; केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीच्या मृत्यूने देश गहिवरला!

...आणि मंदिरातील तो फोटो ठरला शेवटचा; केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीच्या मृत्यूने देश गहिवरला!

त्यांनी मुख्य हायवेने न जाता एक शॉर्टकट रस्ता घेतला होता, नेमका तेथेच घात झाला आणि..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कर्नाटक, 12 जानेवारी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Shirpad Naik) यांच्या गाडीला कर्नाटकातील एका गावात अपघात झाला. यामध्ये त्यांची पत्नी  विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळातून मोठं दु:ख व्यक्त केलं जात आहे. श्रीपाद नाईक कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्याच्यासोबत गाडीत पत्नी आणि आणखी तिघेजणं होते. या अपघातात त्यांच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर झाला आहे. (Shripad Naiks last photo with wife) मात्र दुर्देवाने त्यांच्या पत्नीचं या अपघातात निधन झालं. त्याचा पत्नीसोबतचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये ते दोघं येल्लापूर येथील एका मंदिरात दर्शन घेत असताना दिसत आहे. मंदिरात देवाचं दर्शन घेऊन ते गोकर्णला निघाले होते. गोकर्णला सकाळी 8 वाजता पूजा होती. सकाळी निघालो तर उशीर होईल म्हणून ते रात्री उशिराच तेथून निघाले. दुर्देवाने पत्नीसोबतचा त्यांचा हा फोटो शेवटचा ठरला आहे. उडपीहून येऊन येल्लापूर येथील मंदिरातून गोकर्णला जाणार होते. येल्लापूर येथे शंकराच्या मंदिरात त्यांनी पत्नीसह दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी गोकर्णला सकाळी 8 वाजता पूजा होती. येल्लापूरहून गोकर्णला जाण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता होता. सकाळी पूजेसाठी लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी हा शॉर्टकट घेतला होता. मुख्य हायवेने जाण्याऐवजी त्यांनी या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला.  (Shripad Naiks last photo with wife) हा घाटाचा रस्ता आहे. त्यात रात्र असल्याने समोरील नीट न दिसल्याचे वाहन चालकाकडून सांगितलं जात आहे. ओव्हरटेक करीत असताना समोरील दिसले नाही आणि त्यातच गाडी पलटी झाल्याची माहिती कारवारच्या आमदार रूपाली नाईक यांनी news18 लोकमत दिली. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा यांच्या गाडीला झाल्याची बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. श्रीपाद नाईक यांच्या पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उत्तर कन्नडा जिल्ह्याचे प्रमुख श्रीवरम हेबर यांनी सांगितलं. त्यांना गोव्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समोर आले आहे.  (Shripad Naiks last photo with wife) केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करुन नाईक यांची काळजी घेण्याची विनंती केली आहे. गरज असेल तर दिल्लीला शिफ्ट करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन सर्व व्यवस्था पाहण्याची विनंती केली आहे. श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठं प्रस्थ आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तींयापैकी एक आहेत. गोव्यातील भाजपचा चेहरा म्हणूनही त्यांचा ओळखलं जातं. श्रीपाद नाईक यांचे स्वीय सचिव दीपक यांचाही अपघातात मृत्यू झाल्याच कळतय. अंकोलाहून यल्लापूर मार्गे गोकर्णला जात होते. होनकुंबी गावाजवळ त्यांची गाडी पलटी झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या