JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / असे फुटतात ढग अन् मग येतो पाण्याचा पूर; ढगफुटीचा थक्क करणारा Video

असे फुटतात ढग अन् मग येतो पाण्याचा पूर; ढगफुटीचा थक्क करणारा Video

तुम्ही आजपर्यंत ढगफुटी (Cloud Burst) झाल्याच्या बातम्या ऐकल्या वा वाचल्या असतील. ढगफुटीच्या घटनेनं अनेकदा मोठं नुकसान होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: तुम्ही आजपर्यंत ढगफुटी (Cloud Burst) झाल्याच्या बातम्या ऐकल्या वा वाचल्या असतील. ढगफुटीच्या घटनेनं अनेकदा मोठं नुकसान होतं. जिथे जिथे ढग फुटतात तिथे पाण्याचा पूर येतो. पण तुम्ही कधी ढगफुटी पाहिली आहे का? ढग कसे फुटतात आणि जमिनीवर कसा पूर येतो. सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) ढग फुटल्याचं अप्रतिम दृश्य दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि विचार करायला भाग पडेल की, ढगफुटीमुळे पूर आणि विनाश कसा होतो. हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ढग किती हळू हळू पुढे सरकतात आणि अचानक ढगांच्या मधोमध झपाट्याने पाणी खाली वाहणाऱ्या नदीत मिसळते. मात्र, ढगांमधून पडणारे हे पाणी थेट नदीत जाते. जर हे पाणी एखाद्या सपाट भागात किंवा लोकवस्ती असलेल्या ठिकाणी पडले तर काय होईल याची कल्पना करा.

संबंधित बातम्या

या व्हिडिओमध्ये ढग फुटण्याचा आवाज आणि तीव्रता आणि त्यातून पडणारे पाणी पाहून भीती वाटते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेक यूजर्स हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. देशात आणि जगात अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. पर्वतीय भागात विशेषतः उत्तराखंड, हिमाचल आणि लडाखमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या