JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / माणुसकी! घरातले सर्वच पॉझिटिव्ह, शेवटी उपसरपंचाने दिला अग्नी; PHOTOS पाहून डोळ्यात येईल पाणी

माणुसकी! घरातले सर्वच पॉझिटिव्ह, शेवटी उपसरपंचाने दिला अग्नी; PHOTOS पाहून डोळ्यात येईल पाणी

घरातली सगळी माणसं क्वांटाइन, घरातल्या वृद्ध आजीचा मृत्यू आणि अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी घेतलेला पुढाकार यामुळे माणुसकी जिंवंत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.

0108

जुन्नर: कोरोनाच्या काळात पॉझिटिव्ह झालेल्या आपल्याच माणसांपासून आपली माणसं दूर गेलीत तर काही ठिकाणी दूरची माणसं मदतीनिमित्त जवळ आली. असाच एक माणुसकीचा प्रकार आज जुन्नर तालुक्यात पहायला मिळाला आणि पोलीस आणि आरोग्य विभागाच्या माणुसकीचा प्रत्यय गावकऱ्यांनाही आला.

जाहिरात
0208

जुन्नर तालुक्यातील धनगरवाडीत एकाच कुटुंबातले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असताना घरातील वृद्धेचा आज मृत्यू झाला पण या वृद्धेवर अंत्यसंस्कार करायला कोणीही मागे नसताना नारायणगाव पोलीस आणि आरोग्य विभाग पुढे आला आणि गावकऱ्यांनी सुद्धा या बद्दल प्रशासनाला सॅल्युट केला.

जाहिरात
0308

धनगरवाडीत येथील या कुटुंबात मुंबईची एक महिला गावी आली आणि संसर्गामुळे घरातील सगळेच बाधित झाले.

जाहिरात
0408

या सगळ्यांवर लेण्याद्री COVID केअर सेन्टर येथे उपचार चालु असताना घरातील 85 वर्षीय वृद्ध आजीचा मृत्य झाला.

जाहिरात
0508

आजीच्या अंतविधी करण्यासाठी घरात कोणीही नसल्याने नारायणगाव पोलीस, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने हा केला अंत्यविधी शनिवारी केला.

जाहिरात
0608

धनगरवाडीचे माजी उपसरपंच महेश शेळके यांनी पीपीई किट परिधान करून मृतदेह स्मशान भूमीत पोहच केला आणि अग्निडाग दिला.

जाहिरात
0708

या आजीसुद्धा कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अंदाज असून त्यांचा अंतविधी करण्यासाठी कोणीही नसल्याने पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला

जाहिरात
0808

नात्यातील सगळे कोव्हिडं सेंटरला उपचार घेत असताना प्रशासनातील या कोव्हिडं योध्यानां सलाम केला पाहिजे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या