JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'हर घर तिरंगा' मोहिमेत चक्क कावळाही सहभागी; अत्यंत विलोभनीय असा Video

'हर घर तिरंगा' मोहिमेत चक्क कावळाही सहभागी; अत्यंत विलोभनीय असा Video

हा Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑगस्ट : आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व जनतेला ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी झाले. दरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कावळा तिरंगा घेऊन उडताना दिसत आहे. चक्क कावळा आकाशात तिरंगा फडवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ अत्यंत विलोभनीय आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून India@100 चं व्हिजन मांडलं. विकसित भारताच्या दिशेने 5 प्रतिज्ञांसोबत महिलांच्या सन्मानासाठी स्पष्ट आवाहन, भ्रष्टाचार आणि घराणेशाही नाकारणे आणि आत्मनिर्भर भारतावर लक्ष केंद्रित करून पुढील 25 वर्षांचा रोडमॅप तयार करणे, हे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मोदींच्या सुमारे 83 मिनिटांच्या भाषणाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष आहे. या स्वातंत्र्यदिनी कोणतीही नवीन सरकारी योजना किंवा प्रकल्प जाहीर करण्यात आलेला नाही. PM मोदींनी ‘India@100’ डोळ्यासमोर ठेवून पुढील 25 वर्षांचा दूरदर्शी अजेंडा तयार करण्यावर भर दिला. पीएम मोदी म्हणाले, “या ‘अमृत काल’मध्ये आपल्याला एकत्र येऊन ‘विकसित भारत’च्या मोठ्या ध्येयासाठी काम करायचे आहे.” भारत 2047 साली कसा असावा? PM मोदींनी लाल किल्ल्यावरून माडलं India@100 चं व्हिजन पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘नारी शक्ती’चा उल्लेख महत्त्वाच्या पद्धतीने केला. गेल्या 8 वर्षात महिला मतदारांवर भाजपचे स्पष्ट लक्ष आणि मोदी सरकारच्या अनेक योजनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, पंतप्रधान मोदी म्हणाले की देशातील महिलांबद्दलच्या अनादरामुळे मला खूप दुःख झाले आहे. ते म्हणाले की, स्त्री-पुरुष समानता अत्यंत महत्त्वाची आहे. पीएम म्हणाले, ‘संभाषण आणि आचरणात आपण महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे काहीही करू नये.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या