31
जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्य पुणे दौर्यावर आहेत. राज ठाकरे यांनी मनसेचे लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ पदाधिकारीसोबत आज बीएमसीसी कॉलेजजवळील दरोडे सभागृहातली बैठक घेतली. यावेळेस राज ठाकरे यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकींबाबत आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. येत्या 9 फेब्रुवारीला पुण्यात मनसेची जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे आपली टोलबाबत तसच आगामी निवडणूकांबद्दलची भूमिका मांडणार आहेत.
राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले.पण परवानगी न घेता फटाके उडवल्याब्दतल आयोजकांवर कारवाई होणार असल्याचं इथल्या पोलीस निरिक्षकांनी म्हटल आहे. दरम्यान, आमच्या टोल आंदोलनाबाबत शिवसेनेला काय बोलायचे ते बोलू देत, आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत असं मनसेचे आमदार बाळा नांगदावकर यांनी म्हटलंय.