JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Nagpur Crime: चिमुरड्यांनी वाचवले आईचे दागिने; 3 किमी पाठलाग करत चोराला शिकवला धडा

Nagpur Crime: चिमुरड्यांनी वाचवले आईचे दागिने; 3 किमी पाठलाग करत चोराला शिकवला धडा

Crime in Nagpur: 12 वर्षांचा भूषण आणि 10 वर्षांचा लहान भाऊ सानिध्य या दोघांनी एका चोराचा तब्बल 3 किमी पाठलाग करत आपल्या आईचे चोरी गेलेले दानिगे परत मिळवले (children rescued mother’s jewelry) आहेत.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 19 जुलै: 12 वर्षांचा भूषण आणि 10 वर्षांचा लहान भाऊ सानिध्य या दोघांनी एका चोराचा तब्बल 3 किमी पाठलाग करत आपल्या आईचे चोरी गेलेले दानिगे परत मिळवले (children rescued mother’s jewelry) आहेत. चिमुरड्यांच्या हिम्मतीचं परिसरात कौतुक केलं जात आहे. आई आणि वडील मार्केटला गेले असता, चोरट्यानं संधी साधत घरातील दागिन्यांवर डल्ला मारला होता. पण छतावर खेळणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या प्रसंगावधानामुळे आईचे दागिने परत मिळाले आहे. आई-वडील मार्केटमधून घरी आल्यानंतर ही घटना घटना उघडकीस आली आहे. नागपूरातील (Nagpur) गिट्टीखदान परिसरातील रहिवासी असणारे सुरेश जिवतोडे शनिवारी आपल्या पत्नीसह डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी गेले होते. दरम्यानं त्यांचा बारा वर्षांचा मुलगा भूषण आणि दहा वर्षांचा दुसरा मुलगा सानिध्य घरीच होते. घराच दार पुढे ढकलून दोन्ही मुलं घराच्या छतावर खेळण्यासाठी गेले. दरम्यान घरात कोणी नसल्याचं पाहून एका अज्ञात चोरट्यांनं गुपचूप घरात घुसखोरी केली. कोणालाही थांगपत्ता लागायच्या आत चोरट्यानं घरातील दागिने आपल्या बॅगेत भरले आणि काहीचं घडलं नसल्यासारखं तो घरातून बाहेर पडला. हेही वाचा- उस्मानाबादचा दरोडेखोर नाशकात जाऊन बनला गजरा विक्रेता; कळंबमधील हत्येचा आरोपी अटक पण छतावर खेळणाऱ्या भूषण आणि सानिध्यची नजर चोरट्यावर पडली. संबंधित व्यक्ती आपल्या घरातून बाहेर निघाला आहे. म्हणजे तो नक्कीच चोर असणार या संशयातून दोघा चिमूरड्यांनी आरडाओरडा न करता, चोरट्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. चिमुरड्यांनी आपल्या सायकलीवरून तब्बल 3 किमी पर्यंत पाठलाग केला. चोरट्याचीही सुरुवातीपासून या दोघांवर नजर होती. पण काही अंतर दूर गेल्यानंतर चोरटा घाबरला आणि त्यानं हातातील बॅग रस्त्यावर टाकून धूम ठोकली. हेही वाचा- नागपुरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; धर्मांतर प्रकरणात तिघांची उचलबांगडी भूषण आणि सानिध्य या दोघांच्या चतुराईमुळे आईचे चोरीला गेलेले दागिने परत मिळाले आहेत. आई आणि वडील डीमार्टवरून खरेदी करून आल्यानंतर, चिमुरड्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांच्या कानावर घातला. या प्रकरणी अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या