19 नोव्हेंबर : हरियाणामधील हिसार भागात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये युद्ध पेटलं आहे. मुजोर समर्थकांच्या गुंडगिरीविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून बाबा रामपालवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रामपाल अजूनही आश्रमात असून त्याला अटक होईपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचं हरियाणा पोलिसांनी स्पष्ट केलंय. बाबा समर्थक आणि पोलिसांमधल्या झालेल्या चकमकीत आतापर्यंत 6 जणांचा बळी गेलाय. आताच रामपालचा भाऊ पुरुषोत्तम दास याला अटक करण्यात आलीय.
एखाद्या सिनेमात शोभावा असा पेचप्रसंग हिसारमध्ये सुरू आहे. स्वता:ला आध्यात्मिक गुरू समजणार्या बाबा रामपाल विरोधात पोलिसांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. अटक टाळण्यासाठी रामपाल बाबाने आपल्या आश्रमात लपून बसला आहे. रामपालाला अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असता मंगळवारपासून समर्थक रस्त्यावर उतरले आहे. पोलिसांत आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली आहे. आजही परिस्थिती आणखी चिघळली आहे. रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 6 जणांचा बळी गेलाय. यापैकी 4 महिलांचे मृतदेह आश्रमाने पोलिसांकडे सोपवल्याची माहिती हिसारच्या डीजीपीनी दिलीय. याशिवाय आणखीन एक महिला आणि लहान मुलाचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झालाय. पण आता समर्थक रामपालच्या आश्रमातून बाहेर पडायला लागले आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीये. समर्थकांना बाहेर काढण्याला पोलिसांचं प्राधान्य असून आतापर्यंत 10 हजार समर्थकांनी आश्रम सोडलंय. आश्रमात ठेवण्यात आलेली गॅस सिलेंडर्स, ऍसिड याचा वापर समर्थक शस्त्रांसारखा करू शकतात असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे आश्रमाबाहेरचा पोलीस ताफा वाढवण्यात आलाय. अजूनही पाच हजार रामपाल समर्थक आश्रमात असण्याचा अंदाज आहे. ज्या समर्थकांना बाहेर पडायचंय त्यांना सुरक्षित बाहेर काढल्याशिवाय रामपालला अटक करणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज या प्रकरणी रामपालवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, रामपालचा भाऊ पुरुषोत्तम दास याला अटक करण्यात आलीय. तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डानी हरियाणा सरकारवर तोफ डागली आहे. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्यासाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कोण आहे रामपाल? - रामपाल हा हरियाणातला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू - इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा, सिंचन विभागात कनिष्ठ अभियंता पदावर काम केलंय - 1988 : कबीर पंथातल्या संत रामदेवानंद यांचा अनुयायी झाला - 1993 : प्रवचनं द्यायला सुरुवात केली, रामपालचा ‘बाबा रामपाल’ झाला - 1999 : रोहतक जिल्ह्यात सतलोक आश्रमाची स्थापना केली, नंतर राज्यभरात आश्रम उघडले - 2000 : स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे आर्य समाजींशी मोठा संघर्ष - 2006 : रामपाल समर्थकांनी गावकर्यांवर केलेल्या गोळीबारात एक महिला ठार - रामपालवर खुनाचा गुन्हा दाखल, हरियाणा सरकारने आश्रम ताब्यात घेतला - 2013 : स्थानिकांसोबत झालेल्या संघर्षात 3 ठार, बाबाने आश्रम हिसार जिल्ह्यात हरवला - वारंवार सूचना देऊनही 2010 पासून रामपाल सलग 42 वेळा सुनावणीला गैरहजर +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++