JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / हिमायत बेगच्या फाशीचा आज हायकोर्टात फैसला

हिमायत बेगच्या फाशीचा आज हायकोर्टात फैसला

पुणे - 17 मार्च : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अतिरेकी हिमायत बेगची फाशी कायम ठेवायची की नाही यावर आज (गुरुवारी) मुंबई हायकोर्ट निर्णय देणार आहे. पुणे सेशन कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनच्या हिमायत बेगला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2010 साली पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. 13 फेब्रुवारी 2010.. संध्याकाळी सातच्या सुमाराला पुण्यातल्या जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला. पुण्यावर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

pune_blast_himayat_baig पुणे - 17 मार्च : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अतिरेकी हिमायत बेगची फाशी कायम ठेवायची की नाही यावर आज (गुरुवारी) मुंबई हायकोर्ट निर्णय देणार आहे. पुणे सेशन कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनच्या हिमायत बेगला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2010 साली पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. 13 फेब्रुवारी 2010.. संध्याकाळी सातच्या सुमाराला पुण्यातल्या जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला. पुण्यावर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला. यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर तर 64 जण जखमी झाले. स्फोटानंतर काही महिन्यांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या हिमायत बेगला पुण्यात अटक करण्यात आली. दुसरा आरोपी जबिबउद्दीन अन्सारी याला 26/ 11 प्रकरणी पोलिसांनी अटक केलीय. हिमायतनं केलेला श्रीलंकेचा दौरा आणि सापडलेले इतर पुरावे याच्या आधारे तब्बल 2,500 पानी चार्जशीट पोलिसांनी तयार केलं होतं. 11 मार्चला या प्रकरणातली शेवटची साक्ष झाली आणि त्यानंतर त्याला दोषी ठरवलं. गुन्हेगारी कट रचणं, दहशतवादी कारवाया, बॉम्बस्फोट कटात सहभागी, स्वतःकडे आरडीएक्स बाळगणं, बनावट कागदपत्रं तयार करणं, प्रक्षोभक भाषणं करणं, सदोष मनुष्यवध, खून हिमायत बेगला या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आलंय. या प्रकरणामध्ये भटकळ बंधुंसह इतर पाच आरोपी अजूनही फरार आहेत. हिमायत बेगने काय केलं? - हिमायत बेग याने 31 जानेवारीला जर्मन बेकरीची रेकी केली होती - कटाच्या बैठकीसाठी त्यानं इतर आरोपींना उद्गीरमध्ये जागा उपलब्ध करून दिली - बॉम्ब ठेवण्यासाठीची बॅगही बेगने आणली होती - बॉम्बस्फोटासाठी ज्या नोकिया फोनचा वापर करण्यात आला तो मोबाईलही बेगनेच विकत घेतला होता - कट रचण्यामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या