JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'हल्ल्याच्या तपासाबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही'

'हल्ल्याच्या तपासाबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही'

23 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या तपासाबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली असं त्यांच्या कन्या सातपुते यांनी स्पष्ट केलंय. कॉ. पानसरेंना असलेल्या धोक्याबाबत आयबीच्या इशार्‍याची कोणीही दखल का घेतली नाही, याबाबतची नाराजीही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत पानसरेंच्या कन्या स्मिता आणि जावई बंसी सातपुते यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणेने पानसरेंच्या जीवाला धोका असल्याचा इशारा आधीच दिला होता, तर राज्य सरकारने त्याची दखल का घेतली नाही असा सवाल स्मिता सातपुते यांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

23 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या तपासाबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली असं त्यांच्या कन्या सातपुते यांनी स्पष्ट केलंय. कॉ. पानसरेंना असलेल्या धोक्याबाबत आयबीच्या इशार्‍याची कोणीही दखल का घेतली नाही, याबाबतची नाराजीही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत पानसरेंच्या कन्या स्मिता आणि जावई बंसी सातपुते यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गुप्तचर यंत्रणेने पानसरेंच्या जीवाला धोका असल्याचा इशारा आधीच दिला होता, तर राज्य सरकारने त्याची दखल का घेतली नाही असा सवाल स्मिता सातपुते यांनी केला आहे. तसचं पोलीसांच्या तपासाबाबत आपण असमाधानी असल्याचं त्यांनी सांगितलंय. पोलिसांनी अजूनही या तपासाबाबत कोणतीही माहिती आम्हाला दिली नसल्याचं स्मिता सातपुतेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर आता कम्युनिस्ट पक्ष राज्यात सत्याग्रह सुरू करणार असल्याची माहिती कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या अस्थी 100 ठिकाणी नेऊन तिथे झाडं लावण्यात येतील आणि त्यानंतर सत्याग्रह सुरू करू, असं कांगो यांनी म्हटलं आहे. तसंच शेतकरी, दलित, पाणी प्रश्न यावर यापुढे लढा उभारणार असल्याचंही कांगोंनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या