23 मार्च : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातली तूतूमैमै ताजी असतानाच कपिलनं सुनीलची ट्विटरवर माफी मागितली. पण आतली बातमी अशी आहे की सोनी टीव्हीचे बिझनेस हेड दानिश खान यांनी कपिलची चांगलीच कानउघाडणी केलीय. दानिश खान कपिलला म्हणाले, ‘सोनी टीव्हीचा टीआरपी वाढतोय. अशा वेळी अशा घटनांनी सोनीची प्रतिमा खराब होऊ शकते.’ त्याचाच परिणाम असा झाला की कपिलनं ट्विट करून सुनील ग्रोवरची माफी मागितली. आता कपिलच्या शोच्या शूटला एक एक जण गैरहजर राहतोय. त्यामुळे अजूनही सर्व काही शांत झालंय, असं म्हणता येणार नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv