JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'सूरज परमारांना पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते'

'सूरज परमारांना पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते'

ठाणे - 20 फेब्रुवारी : सूरज परमार यांना पालिकेच्या अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते असा धक्कादायक खुलासा कॉसमॉस ग्रुपचे वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरज परमार प्रकरणातील तपासात आणखी धक्कादायक खुलासा झालाय. त्यात कॉसमॉस ग्रुप च्या वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी हा खुलासा ठाणे पोलिसांकडे केलाय. बांधकाम व्यवसायात पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतात याचा पुन्हा खुलासा सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यासोबत पालिकेच्या अधिकार्‍यांना सूरज परमार यांनी पैसे दिल्याचेही कबुली चौकशी दरम्यान दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

suraj parmar_buldier ठाणे - 20 फेब्रुवारी : सूरज परमार यांना पालिकेच्या अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते असा धक्कादायक खुलासा कॉसमॉस ग्रुपचे वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरज परमार प्रकरणातील तपासात आणखी धक्कादायक खुलासा झालाय. त्यात कॉसमॉस ग्रुप च्या वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी हा खुलासा ठाणे पोलिसांकडे केलाय. बांधकाम व्यवसायात पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतात याचा पुन्हा खुलासा सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यासोबत पालिकेच्या अधिकार्‍यांना सूरज परमार यांनी पैसे दिल्याचेही कबुली चौकशी दरम्यान दिली आहे. एवढे सगळे पुरावे समोर आल्या नंतरही आजपर्यंत ठाणे पोलिसांनी ठाणे महानगर पालिकेच्या कोणत्याही अधिकार्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अडवणूक केल्याबद्दल अटक केलेली नाहीय. आयकर विभागाच्या धाडीत आणि इतर ठिकाणीही सर्व सरकारी विभागांना पैसे दिल्याची नोंद सूरज परमार यांनी केलेली आहे असं असताना कोणत्याही सरकारी बाबूला अटक न होणे ही तपासतील त्रुटी दाखवत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या