सुब्रतो रॉय यांचा तुरुंगात मुक्काम वाढला
13 मार्च : सहारा समुहाचे सुब्रतो रॉय यांना आजही सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळत पुढची सुनावणी 25 तारखेला ठेवलीय.
गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार, याबाबत सहाराने अजून प्रस्ताव दिलेला नाही. हा प्रस्ताव दिल्यावरच त्यांच्या याचिकेवर विचार करू, असं कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलंय.
अटकेपासून सुटका करून घेण्याचा पर्याय सहारा यांच्याच हातात असल्याचंही कोर्टाने म्हटलंय. त्यामुळे आता 25 तारखेपर्यंत सुब्रतो रॉय यांना तुरुंगातच रहावं लागणार आहे.