JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सुनंदा पुष्कर यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना

सुनंदा पुष्कर यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना

07 जानेवारी : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असल्याचं दिल्लीचे पोलीसांनी बुधवारी जाहीर केलं. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि विषप्रयोगाने झाल्याच्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. 51 वर्षांच्या सुनंदा यांचा 17 जानेवारी 2014ला एका आलिशान हॉटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक होता, असा प्राथमिक अंदाज एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी वर्तवला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sunanda pushkar drug overdose_0_0_0 07 जानेवारी : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असल्याचं दिल्लीचे पोलीसांनी बुधवारी जाहीर केलं. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि विषप्रयोगाने झाल्याच्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. 51 वर्षांच्या सुनंदा यांचा 17 जानेवारी 2014ला एका आलिशान हॉटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक होता, असा प्राथमिक अंदाज एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी वर्तवला होता. या अहवालात फेरफार करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यावेळी गुप्ता यांनी केला होता. आता दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यामुळे डॉक्टर गुप्ता यांची भूमिका योग्य होती, असंच समोर येतंय. सुनंदा यांनी विष स्वत:हून घेतले की त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन देण्यात आले, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी सुनंदा यांच्या व्हिसेराचे नमुने आता इंग्लंड किवा अमेरिकेला पाठवण्यात येणार आहेत. पोलिसांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र, या प्रकरणी शशी थरूर यांची आणि सुनंदांच्या इतर नातेवाईकांची चौकशी करू, असंही काल दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, शशी थरूर सध्या केरळमध्ये आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. पण, थरूर यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी थरूर यांच्यावर कुठलाच दबाव नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. सुनंदा पुष्कर यांच्या हत्येचं गूढ

सीएनएन आयबीएनच्या हाती एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा महत्त्वाचा अहवाल लागलं आहे. या अहवालाच्याच आधारे दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून,  नव्याने तपास सुरू केला आहे. काय म्हटलंय अहवालात

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या