JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'सिंधुरत्न' अपघात : दोन बेपत्ता अधिकार्‍यांचा मृत्यू

'सिंधुरत्न' अपघात : दोन बेपत्ता अधिकार्‍यांचा मृत्यू

27 फेब्रुवारी : नौदलाच्या सिंधुरत्न पाणबुडीला झालेल्या अपघातात बेपत्ता असलेल्या दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. लेफ्टनंट कमांडर कपिश मुवल आणि लेफ्टनंट कमांडर मनोरंजन कुमार यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घोषणा नौदलाने केली आहे. या दुर्घटनेमुळे संरक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. नौदल तसंच केंद्र सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. काल नौदलप्रमुख ऍडमिरल डी.के. जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे आणखीही काही अधिकारी राजीनामे देऊ शकतील अशी माहिती आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sindhuratna latest image 27 फेब्रुवारी :  नौदलाच्या सिंधुरत्न पाणबुडीला झालेल्या अपघातात बेपत्ता असलेल्या दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. लेफ्टनंट कमांडर कपिश मुवल आणि लेफ्टनंट कमांडर मनोरंजन कुमार यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घोषणा नौदलाने केली आहे. या दुर्घटनेमुळे संरक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नौदल तसंच केंद्र सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. काल नौदलप्रमुख ऍडमिरल डी.के. जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे आणखीही काही अधिकारी राजीनामे देऊ शकतील अशी माहिती आहे. नेटवर्क 18 ला मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे चीफ आज दुपारी संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांची भेट घेणार आहेत.थोड्याच वेळापूर्वी अँटोनी यांनी या प्रकरणी पंतप्रधानांशी चर्चा केली. ‘मला या घटनेमुळं खुप दु:ख झालंय असं संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी म्हटलंय. माजी नौदल प्रमुख डी.के.जोशी यांनी काल माझी भेट घेऊन आपला राजीनामा लवकरात लवकरत राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती केली.याबाबत मी पंतप्रधानांशीही बातचीत केली’, असंही अँटनी म्हणाले.या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नौदलानं समिती स्थापन केलीये. आज सकाळी ही पाणबुडी नेव्हल डॉकमध्ये पोहोचली. पाणबुडीचे आतल्या बाजूने काहीही नुकसान झाले नसल्याचे समजते. तर दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, तर या प्रकरणाची जबाबदारी घेऊन संरक्षण सचिव आणि संरक्षणमंत्री या दोघांनी राजीनामा द्यावा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सिंधुरत्न : नौदलाचं निवेदन

याबाबत, नौदलानं एक निवेदन प्रसिद्ध केलंय, त्यात नौदलानं काय म्हटलंय ते पाहूया…

 आज सकाळी सिंधुरत्न पाणबुडी नेव्हल डॉकमध्ये पोहोचली.  दोन अधिकार्‍यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना शोधण्यासाठी सर्व प्रयत्न होत आहेत. पाणबुडीवरचे इतर क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी रिअर ऍडमिरल दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून त्याचे काम सुरू झालेय. सिंधुरत्नचे व्हेन्टिलेशन करणे, दोन अधिकार्‍यांचा शोध घेणे, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेणे आणि पाणबुड्यांची कामगिरी सुरक्षित होण्यासाठी उपाययोजना सुचविणे ही या समितीची उद्दिष्ट्ये आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या