पुणे - 01 मार्च : सहारा उद्योग समुहाला महसूल विभागाने चांगलाच दणका दिलाय. लोणावळ्याजवळ मुळशी इथं सर्वात मोठा गृहप्रकल्प असलेल्या अॅम्बी व्हॅली सोसायटीच्या गेटला टाळं ठोकलं तसंच कार्यालयालाही ठाळं ठोकण्यात आलं आहे. 4 कोटी 82 लाखांचा महसूल थकवल्या प्रकरणी तहसीलदार प्रशांत ढगे यांनी ही धडक कारवाई केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अॅम्बी व्हॅली सोसायटीकडे 4 कोटी 82 लाखांचा महसूल थकीत होता. याबद्दल वारंवार नोटीसाही बजावण्यात आल्यात. पण, हा दंड भरला गेला नाही. अखेर आज तहसीलदार प्रशांत ढगे यांनी पोलिसांच्या फाैजफाट्यासह अॅम्बी व्हॅलीच्या प्रवेशद्वाराला आणि कार्यालयाला टाळं ठोकलं. या कारवाईमुळे सहारा समुहाच्या अडचणीत वाढ झालीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv