JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सत्तेसाठी 'आप' घेणार दिल्लीकरांचे जनमत

सत्तेसाठी 'आप' घेणार दिल्लीकरांचे जनमत

17 डिसेंबर : दिल्लीत सरकार स्थापनेच्या निर्णयावर आम आदमी पार्टीने जनमत चाचणी घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीकरांना मोबाईद्वारे, एसएमएसकरुन तसंत आपच्या वेबसाईटवरुनही आपली मतं नोंदवता येणार आहेत. यानंतर सोमवारी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलंय. 70 जागांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने 28 जागा जिंकल्यात तर भाजपाला 32 आणि काँग्रेसला 8 जागा मिळाल्यात. भाजपला सत्ता स्थापनसाठी 4 जागा कमी पडत असून विरोधी पक्षात बसण्याची भाजपने ठाम भूमिका घेतलीय. तर काँग्रेसनं ‘आप’ला बिनशर्त पाठिंबा दिलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

arvinda kejriwal 17 डिसेंबर : दिल्लीत सरकार स्थापनेच्या निर्णयावर आम आदमी पार्टीने जनमत चाचणी घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीकरांना मोबाईद्वारे, एसएमएसकरुन तसंत आपच्या वेबसाईटवरुनही आपली मतं नोंदवता येणार आहेत. यानंतर सोमवारी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलंय.

 70 जागांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने 28 जागा जिंकल्यात तर भाजपाला 32 आणि काँग्रेसला 8 जागा मिळाल्यात. भाजपला सत्ता स्थापनसाठी 4 जागा कमी पडत असून विरोधी पक्षात बसण्याची भाजपने ठाम भूमिका घेतलीय. तर काँग्रेसनं ‘आप’ला बिनशर्त पाठिंबा दिलाय.

पण हा पाठिंबा स्विकारावा का आणि दिल्लीत सत्ता स्थापन करावी का यासाठी आम आदमी पार्टीनं जनतेचं मत मागवलंय. ‘आप’नं यासंबंधी एक पत्र लिहिलं असून त्याच्या 25 लाख प्रती जनतेमध्ये वाटल्या जाणार आहेत आणि रविवारपर्यंत लोकांची मतं मागवली जाणार असल्याचं आपच्या अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या