JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सत्तास्थापनेसाठी भाजपची तयारी सुरू

सत्तास्थापनेसाठी भाजपची तयारी सुरू

13 मे : लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं, पोस्ट पोल सर्व्हे आले आणि या सर्व्हेमध्ये भाजपप्रणित एनडीए बहुमत मिळवेल असं दाखवण्यात आलं. यानंतर आता भाजपच्या गोटात वेगाने घडामोडी घडायला सुरुवात झालीय. भाजपचे वरिष्ठ नेते उद्या (बुधवारी) गांधीनगरमध्ये बैठक घेत आहेत. त्यासाठी हे नेते गुजरातमध्ये दाखलही झाले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, अरुण जेटली आणि नितीन गडकरी हे बैठकीला हजर असणार आहे. त्यामुळे सरकार स्थापना आणि त्यानिमित्ताने पक्षसंघटनेत होणारे फेरबदल, याची चर्चा या बैठकीत होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Nitin Gadkari, Sushma Swaraj, Rajnath Singh, Lal Krishna Advani, Narendra Modi, Arun Jaitley 13 मे : लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं, पोस्ट पोल सर्व्हे आले आणि या सर्व्हेमध्ये भाजपप्रणित एनडीए बहुमत मिळवेल असं दाखवण्यात आलं. यानंतर आता भाजपच्या गोटात वेगाने घडामोडी घडायला सुरुवात झालीय.

भाजपचे वरिष्ठ नेते उद्या (बुधवारी) गांधीनगरमध्ये बैठक घेत आहेत. त्यासाठी हे नेते गुजरातमध्ये दाखलही झाले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, अरुण जेटली आणि नितीन गडकरी हे बैठकीला हजर असणार आहे.

त्यामुळे सरकार स्थापना आणि त्यानिमित्ताने पक्षसंघटनेत होणारे फेरबदल, याची चर्चा या बैठकीत होईल. दरम्यान, गडकरींनी सोमवारी नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आज सकाळी लालकृष्ण अडवाणी आणि दुपारी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सामिल झाले तर भाजपचे अध्यक्ष गडकरी होतील, अशी चर्चा सुरू झालीय. गडकरी यांनी मात्र याचा इन्कार केलाय.

संबंधित बातम्या

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या