JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / संजय दत्तच्या रजेची चौकशी करणार- गृहराज्यमंत्री राम शिंदे

संजय दत्तच्या रजेची चौकशी करणार- गृहराज्यमंत्री राम शिंदे

26 डिसेंबर : अभिनेता संजय दत्तला कारागृहातून वारंवार मिळणार्‍या रजेची चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या गृहखात्याने घेतला आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात पॅरोल आणि फर्लो रजेवर सुमारे चार महिने जेलबाहेरच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गृह खात्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अभिनेता संजय दत्तला मिळणार्‍या रजेबाबत सध्या सर्वत्र टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदे म्हणाले, संजय दत्तला मेहरबानी करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, संजय दत्तला देण्यात येणार्‍या रजा आणि इतर कैद्यांना देण्यात येणार्‍या रजा यात जर काही तफावत असेल त्याची तात्काळ दखल घेतली जाईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sanjay-gun-read

26 डिसेंबर  : अभिनेता संजय दत्तला कारागृहातून वारंवार मिळणार्‍या रजेची चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या गृहखात्याने घेतला आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात पॅरोल आणि फर्लो रजेवर सुमारे चार महिने जेलबाहेरच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गृह खात्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अभिनेता संजय दत्तला मिळणार्‍या रजेबाबत सध्या सर्वत्र टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदे म्हणाले,  संजय दत्तला मेहरबानी करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, संजय दत्तला देण्यात येणार्‍या रजा आणि इतर कैद्यांना देण्यात येणार्‍या रजा यात जर काही तफावत असेल त्याची तात्काळ दखल घेतली जाईल. मात्र सामान्य कैद्यांप्रमाणेच जर संजय दत्तला सुटी दिली गेली असेल तर इतरांनाही ती दिली जाते का हे तपासावे लागेल, असे शिंदेंनी सांगितले.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोर्टाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 18 महिन्याची शिक्षा त्याने निकालापूर्वीच भोगली आहे. मे 2013 पासून उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी तो पुन्हा जेलमध्ये गेला. पण त्यानंतर संजय दत्त वारंवार पॅरोल व फर्लो रजेवर तुरुंगातून बाहेर आला आहे. पायाचे दुखणे, पत्नीचे आजारपण अशी अनेक कारणे देत त्याने रजा मिळवली व त्यात मुदतवाढही घेतली. कारागृह प्रशासनाने त्याला मंगळवारी 14 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली असून सध्या संजूबाबा पुन्हा तुरुंगाबाहेर आला आहे.

संबंधित बातम्या

संजय दत्तला मिळालेल्या रजा :

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या