मुंबई - 23 फेब्रुवारी : फॅन किती वेडे असता आणि ते आपल्या लाडक्या हिरोसाठी कायपण करू शकता याचं आणखी एक उदाहरण मुंबईत पाहण्यास मिळणार आहे. गुरुवारी अभिनेता संजय दत्त कायमचा जेलबाहेर येतोय या खुशीत एका चाहत्याने त्याच्या हॉटेलमध्ये ‘चिकन संजूबाबा’ अशी डिश तयार केली असून आणि ही डिश गुरूवारी विनामुल्य खाण्यास मिळणार असं जाहीर केलंय.
1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त येत्या गुरुवारी कायमचा जेलबाहेर येणार आहे. संजूबाबा जेलबाहेर येणार असल्याच्या खुशीत खालिद हकीम या चाहत्याने आपल्या हॉटेलमध्ये चिकन संजूबाबा डिश विनामुल्य देण्याची घोषणा केलीय. दुपारी 12 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ही डिश विनामुल्य देण्यात येणार आहे. खालिद यांचं दक्षिण मुंबईच्या भेंडी बाजार मोहम्मद अली रोड परिसरात नूर मोहम्मदी हॉटेल आहे. विशेष म्हणजे, खालिद हकीम यांना खूप वर्षांपूर्वी संजूबाबानंच ही डिश कशी करायची हे सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी या डिशचं नाव ‘चिकन संजूबाबा’ ठेवलं. तेव्हापासून ही डिश इथं लोकप्रिय आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv