10 फेब्रुवारी : आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला आहे. गुरूनाथ मय्यपन याच्यावरच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना हा धक्का मानला जातोय.
इतकच नाही तर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात असलेल्या बेटिंगच्या आरोपांची अजून चौकशी होणं गरजेचं आहे, असंही या समितीने आपल्या अहवालात म्हटलं आहे. गुरुनाथ मय्यप्पन हा चेन्नई सुपर किंग्जचा पदाधिकारी नव्हता असं चेन्नई टीमने म्हटलं होतं हा दावा मुदगल समितीने फेटाळून लावला आहे.
त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्जचं आयपीएलमधील भवितव्य टांगणीला लागलंय. आयपीएलच्या नियमांनुसार कोणत्याही टीमचा पदाधिकारी जर मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये दोषी आढळला, तर त्या टीमवर बंदीची कारवाई होऊ शकते. मुदगल समितीने आपल्या या अहवालात बीसीसीआयसाठी काही मार्गदर्शक तत्वंही आखून दिली आहे.