06 फेब्रुवारी : अंधेरीतल्या जमीन घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केलाय. संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्लांनी ही जमीन अजूनही परत केलीच नसल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय.
जोगेश्वरीमधील कोट्यवधींची जमीन शुक्ला यांना फक्त 98 हजारांना मिळवली होती. शुक्लांच्या बीएजी (BAG) फिल्म्स एज्युकेशन सोसायटीला ही जमीन मिळाली होती. पण त्यावर एसआर ए (SRA) स्किम लागू करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
मीडियात ही बातमी आल्यानंतर शुक्लांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून जमीन परत करणार असल्याचं म्हटलं होतं. पण अजूनही ही जमीन परत करण्यात आलेली नाही. यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोमय्यांनी दिलाय.