07 जुलै : शहरात 47 रुपये आणि गावात 32 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारा गरीब समजला जाईल, अशी गरिबीची नवी व्याख्या रंगराजन समितीनं ठरवली आहे. देशात 10 पैकी 3 गरीब असल्याचाही अहवाल त्यांनी सादर केला आहे.
पंतप्रधानांच्या अर्थविषयक सल्लागार समितीचे माजी सल्लागार सी. रंगराजन यांच्या पॅनेलनं देशातली गरिबी निश्चित करणार्या सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल फेटाळला आहे. 2011-12 मध्ये देशातली 29.5 टक्के लोकसंख्या गरीब होती, असं रंगराजन पॅनेलनं म्हटलं आहे. 2009-10 मध्ये देशातली गरिबी 38.2 टक्के इतकी होती, असाही निष्कर्ष या पॅनेलनं काढला आहे. तेंडुलकर समितीने काढलेल्या निष्कर्षांनुसार, 2009-10 मध्ये देशातली गरिबी 29.8 टक्के होती आणि ती आता घसरून 21.9 टक्के झाली आहे. नियोजन मंत्री राव इंदरजित सिंग यांना हा अहवाल सोपवण्यात आला. त्यानुसार शहरामध्ये 47 रुपयांपेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब समजली जाईल. तेंडुलकर समितीनं 33 रुपयांची मर्यादा सुचवली होती.
तेंडुलकर समितीच्या निकषांवर आधारित 2011 मध्ये नियोजन आयोगानं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यानुसार शहरी भागात 33 रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार्या आणि ग्रामीण भागात 27 रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार्या व्यक्ती गरीब मानल्या जाता येणार नाहीत. त्यावरून नियोजन आयोगावर टीकेची झोड उठली होती. तेंडुलकर समितीच्या अभ्यास पद्धतीचा आढावा घेण्यासाठी गेल्या वर्षी सी. रंगराजन समितीची स्थापना करण्यात आली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++