09 मार्च : आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीचा अपघात ताजा असतानाचं नौदलात आणखी एक पाणबुडीला अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी आहेत.
विशाखापट्टणम इथे जहाज बांधणी केंद्रात हा अपघात झाला. या केंद्रात देशातल्या दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाच्या मोठा पाणबुड्या आहेत. आयएनएस अरिहंत वर्गातल्या पाणबुडीच्या हायड्रॉलिक टँकची तपासणी सुरु असताना हा अपघात घडला. डीआरडीओच्यानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत.
दरम्यान, मुंबईत शुक्रवारीच नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ या माझगाव गोदीत अपघात झाला होता. यामध्येही नौदल अधिकार्याचा मृत्यू झाला होता तर गोदीतील अन्य दोन कर्मचारी जखमी झाले होते.