JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / वाय-फाय वादात पुतण्या 'कनेक्ट' काका 'डिस्कनेक्ट' !

वाय-फाय वादात पुतण्या 'कनेक्ट' काका 'डिस्कनेक्ट' !

15 जुलै : फ्री वाय-फायवरून शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र या ‘वायफळ’ वादात पुतण्याने आता काकांवर बाजी मारली आहे. शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेच्या युवासेनेनं वाय-फाय सेवा सुरू करत मनसेवर कुरघोडी केलीय. मनसेच्या वाय-फाय सेवेचं आज संध्याकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सादरीकरण झालं. पण त्यापूर्वीच दुपारी युवा सेनेनं 200 मीटरपर्यंत वाय फाय सेवा सुरू करत बाजी मारली. यावेळी स्वत: आदित्य ठाकरे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ‘आमचं वाय-फाय’ असं म्हणत मनसे आणि शिवसेनेत वाद पेटलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

aditya_thakare_mns 15 जुलै : फ्री वाय-फायवरून शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र या ‘वायफळ’ वादात पुतण्याने आता काकांवर बाजी मारली आहे. शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेच्या युवासेनेनं वाय-फाय सेवा सुरू करत मनसेवर कुरघोडी केलीय. मनसेच्या वाय-फाय सेवेचं आज संध्याकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सादरीकरण झालं. पण त्यापूर्वीच दुपारी युवा सेनेनं 200 मीटरपर्यंत वाय फाय सेवा सुरू करत बाजी मारली. यावेळी स्वत: आदित्य ठाकरे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ‘आमचं वाय-फाय’ असं म्हणत मनसे आणि शिवसेनेत वाद पेटलाय. मनसेनं फ्री वाय-फायसाठी आपण पहिली सुरुवात केलीय सेनेनं दादरचं शिवाजी पार्क सोडून दुसरीकडे वायफाय लावावं असं म्हटलं होतं. पण सेनेनं आम्हीच पहिले आलो असं सांगत वाय-फाय सुरू करण्याचा चंग बांधला. आणि याज या वादाला नवे वळण मिळाले. मनसेच्या वाय-फाय सेवा सुरू होण्याअगोदरच शिवसेनेच्या युवासेनेनं शिवाजीपार्कमध्ये वाय-फाय सुरू करून टाकलंय. दीड वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाचे कलिना आणि फोर्ट हे दोन्ही कॅम्पसमध्ये फ्री वाय फाय ची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं केली होती. यासाठी त्यांनी पालिका आयुक्त आणि महापौरांना पत्रंही लिहिली होती. मात्र आता शिवसेना आणि मनसेनं वाय-फाय आमचंच असं सांगून कुरघोडी सुरू केलीय. दरम्यान, मध्यंतरी मनसेनं र फ्री वाय-फाय देण्याचा पहिला प्रयोग मुंबईच्या विलेपार्ले परिसरात सुरू केला. फ्री वाय-फाय सुविधेवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जाईल असं सेना-भाजपचं मत आहे. पण तरुण वर्गाने या निःशुल्क सेवेचा फायदा घेत मनसेच्या प्रकल्पाला पाठिंबा दिला. काय आहे ‘वाय-फाय’ चा वाद 2 जुलै 2014 - उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वाय-फाय प्रकल्पाबाबत दिली माहिती 3 जुलै 2014 - मनसेच्या संदीप देशपांडेंनी मनसेचा वाय-फाय प्रकल्प 90% पूर्ण झाल्याचा केला दावा 4 जुलै 2014 - माजी महापौर श्रद्धा जाधवांनी मनसेच्या प्रकल्पाबाबत पालिका सभागृहात उपस्थित केला हरकतीचा मुद्दा 7 जुलै 2014 - महापालिका विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकरांची संदीप देशपांडेंवर एफआयआर दाखल करण्याची मागणी 13 जुलै 2014 - राज ठाकरेंनी विलेपार्ले इथे वाय-फाय सेवेचं केलं उद्घाटन 15 जुलै 2014 - शिवसेना आणि मनसे शिवाजी पार्कमध्ये वाय-फाय सेवेचं केलं उद्घाटन काँग्रेसच्या कृष्णा हेगडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संपूर्ण मुंबईत वाय-फाय देण्याची केली मागणी +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या