JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ओडिशा-आंध्रला वादळी पावसाचा तडाखा, 30 जणांचा मृत्यू

ओडिशा-आंध्रला वादळी पावसाचा तडाखा, 30 जणांचा मृत्यू

26 ऑक्टोबर : फायलीन वादळानंतर ओडिशाला वादळी पावसाचा तडाखा बसलाय. ओडिशात अतिवृष्टीमुळे 17 जणांचा बळी गेलाय. तर जवळपास दीड लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलंय. खुर्दा ते विशाखापट्टणम दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये. तब्बल 12 जिल्ह्यांमधल्या शाळा आणि कॉलेजेस सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अतिवृष्टीचा फटका क्रिकेट मॅचलही बसलाय. कटकमध्ये होणारी वन डे मॅच रद्द करण्यात आलीय. तर आंध्रच्या किनारपट्टीलाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. या भागात 12 लोकांचा बळी गेलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

odisa rain 26 ऑक्टोबर : फायलीन वादळानंतर ओडिशाला वादळी पावसाचा तडाखा बसलाय. ओडिशात अतिवृष्टीमुळे 17 जणांचा बळी गेलाय. तर जवळपास दीड लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलंय. खुर्दा ते विशाखापट्टणम दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये. तब्बल 12 जिल्ह्यांमधल्या शाळा आणि कॉलेजेस सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अतिवृष्टीचा फटका क्रिकेट मॅचलही बसलाय. कटकमध्ये होणारी वन डे मॅच रद्द करण्यात आलीय. तर आंध्रच्या किनारपट्टीलाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. या भागात 12 लोकांचा बळी गेलाय. किनारपट्टीच्या भागातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. या भागात जवळपास 2,000 कोटी रुपयांच्या पिकाचं नुकसान झालंय. किनारपट्टीलगत असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हाय ऍलर्ट जारी करण्यात आलाय. श्रीकाकुलम आणि मेहबूबनगर या जिल्ह्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या