JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / लोकसभा निवडणुकीसाठी 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

16 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने (आप) 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून अंजली दमानिया, विजय पांढरे, मेधा पाटकर, मीरा सन्याल आणि मयांक गांधी यांचा समावेश आहे. मेधा पाटकर यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्या कोणत्या मतदारासंघातून आणि कोणत्या पक्षाच्या वतीने निवडणुक लढविणार याबद्दल गुप्तता पाळली होती. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्यावर आपचे संजयसिंह आणि मनीष सिसोदिया ठोस उत्तर देऊ शकले नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

medha patkar, mayanka gandhi, damania, aap member 16 फेब्रुवारी :  लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने (आप) 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून अंजली दमानिया, विजय पांढरे, मेधा पाटकर, मीरा सन्याल आणि मयांक गांधी यांचा समावेश आहे. मेधा पाटकर यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्या कोणत्या मतदारासंघातून आणि कोणत्या पक्षाच्या वतीने निवडणुक लढविणार याबद्दल गुप्तता पाळली होती. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्यावर आपचे संजयसिंह आणि मनीष सिसोदिया ठोस उत्तर देऊ शकले नाही.

महाराष्ट्रात अंजली दमानिया नागपूरमधून निवडणूक लढविणार आहेत. भाजप माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी  नागपूरमधून लोकसभेची निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. त्याच्या विरोधात ‘आप’ने दमानिया यांना उमेदवारी दिली आहे. भ्रष्टाचाराविरोधात दमानिया महाराष्ट्रात काम करत असल्याचे संजयसिंह यांनी सांगितले.पत्रकार आशुतोष यांना ‘आप’ने दिल्लीतील चांदणी चौक मतदार संघातून रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना आव्हान देण्याची ‘आप’ची तयारी आहे. तर अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरोधात कुमार विश्वास निवडणूक लढणार आहे. याची घोषणा विश्वास यांनी आधीच केली होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक झाली त्यात 20 उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली आणि पहिली यादी तयार करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने  दुपारी साडे तीन वाजता संजयसिंग आणि मनीष सिसोदीया यांनी माध्यमांसमोर यादी जाहीर केली.

अरविंद केजरीवाल यांनीराजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाचं ‘आयबीएन नेटवर्क’ला दिलेल्या खास मुखातमध्ये त्यांनी आपण लोकसभा लढवायची की नाही, याबद्दलचा निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. तुम्ही मोदींविरोधात निवडणुक लढविणार का, या प्रश्नावर हसत हसत ते म्हणाले, मला काही हिरो व्हायचे नाही. आमचा लढा भ्रष्टाचाराविरोधात आहे. लोकसभेसाठी जेवढे भ्रष्टाचारी लोक उभे राहातिल त्यांच्या विरोधात आप उमेदवार देणार आहे. आम्ही जनतेला आवाहन करणार हे दोन उमेदवार तुमच्या समोर आहेत, यातील योग्य कोण हे तुम्ही ठरवा. भ्रष्ट नेत्यांना लोकसभेत जाण्यापासून रोखणे हे आमचे ध्येय आहे.

‘आप’ची लोकसभेची पहिली यादी (महाराष्ट्र)

आप’ च्या उमेदवारांची लोकसभेसाठी पहिली यादी (बाकी)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या