JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / रुळाला तडे गेल्याने ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

रुळाला तडे गेल्याने ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

07 जानेवारी : रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झालेली पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेची सेवा वारंवार खंडित होताना दिसत आहे. आज सकाळी सायन आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुंबईहून ठाण्याकडे जाणारी डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सध्या स्लो मार्गावरील वाहतूक फास्ट मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
333mumbai_local_

07 जानेवारी : रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झालेली पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेची सेवा वारंवार खंडित होताना दिसत आहे. आज सकाळी सायन आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुंबईहून ठाण्याकडे जाणारी डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

सध्या स्लो मार्गावरील वाहतूक फास्ट मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागणार याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून अद्यापपर्यंत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

कालच अंबरनाथ येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे रखडली होती. याशिवाय, गेल्याच आठवड्यात दिवा येथे पेंटोग्राफ तुटल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संतप्त प्रवाशांनी रेल रोको करत मोटरमनवर हल्लाही केला होता. थेट रेल्वे मंत्र्यांपासून सर्वांनी आश्वासनं देऊनही प्रत्यक्षात मात्र काहीच फरक पडलेला नाहीये. मध्य रेल्वेचे रडगाणे अजूनही सुरूच आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या