JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / राजस्थानमध्ये वसुंधरा 'राज',मध्यप्रदेशात चौहान यांची हॅटट्रिक

राजस्थानमध्ये वसुंधरा 'राज',मध्यप्रदेशात चौहान यांची हॅटट्रिक

08 डिसेंबर : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणार्‍या चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपने विजय चौकार लगावत दणदणीत विजय मिळवला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान आण छत्तीसगडमध्ये भाजपने एकहाती सत्ता राखली आहे. मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवाराज सिंग चौहान हॅट्ट्रिक साधली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजप तब्बल 161 जागा पटकावल्या आहेत. इथं भाजपच्या तुलनेत काँग्रेसला फक्त 60 जागा मिळाल्या आहे. तर राजस्थानमध्ये भाजपच्या वादळात काँग्रेस जमीनदोस्त झाले असून आता वसुंधरा राजे पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

vasundhara raje and shivraj 08 डिसेंबर : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणार्‍या चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपने विजय चौकार लगावत दणदणीत विजय मिळवला आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थान आण छत्तीसगडमध्ये भाजपने एकहाती सत्ता राखली आहे. मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवाराज सिंग चौहान हॅट्ट्रिक साधली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजप तब्बल 161 जागा पटकावल्या आहेत. इथं भाजपच्या तुलनेत काँग्रेसला फक्त 60 जागा मिळाल्या आहे.

तर राजस्थानमध्ये भाजपच्या वादळात काँग्रेस जमीनदोस्त झाले असून आता वसुंधरा राजे पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. 200 जागांसाठी इथं मतदान घेण्यात आलं. भाजपने बहुमताचा आकडा पार करत 161 जागा मिळवल्या आहेत. तर नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत भाजपने बाजी मारली. भाजपने 48 जागा मिळवल्या आहे तर काँग्रेसला 40 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

संबंधित बातम्या

दिल्लीत भाजप सत्तेच्या समीप आहे. दिल्लीत भाजपने 32 जागा जिकल्या असून बहुमताने हुलकावणी दिलीय. इथंही काँग्रेसला सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दिल्लीत बहुमतासाठी 36 जागा लागणार आहे. त्यामुळे दिल्लीत कोण सत्ता स्थापणार असा प्रश्न उपस्थित झालाय. मात्र चारही राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री असेल असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलाय.

जाहिरात

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आसंमत डोक्यावर घेतले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर भाजपचे आघाडी घेतली आणि एकच जल्लोषाला सुरूवात केली. देशभरात भाजप कार्यकर्ते फटाके फोडून जल्लोष करत आहे. एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या