04 डिसेंबर: ‘रणवीर सिंग आणि दीपिकानं आता लग्न केलं पाहिजे आणि सुंदर बाळांना जन्म दिला पाहिजे,’ हे उद्गार आहेत अभिनेता रणबीर कपूरचे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये रणवीर आणि रणबीर एकत्र आले होते. त्यावेळी तमाम फॅन्सच्या इच्छेप्रमाणे आपलीही ही इच्छा असल्याचं रणबीर कपूर म्हणाला. काही वर्षांपूर्वी रणबीर कपूर आणि दीपिका यांची गाढ मैत्री होती.
यावर रणवीर सिंगची प्रतिक्रिया विचारल्यावर तो म्हणाला, ’ कॉफी विथ करण हा टाइमपास शो आहे.यात बऱ्याच गोष्टी अशाच असतात. त्यांना फार गांभीर्यानं घ्यायचं नसतं.’ रणबीर आपला चांगला मित्र असल्याचं रणवीर म्हणाला. रेडिओ मिर्चीच्या एका कार्यक्रमात रणवीर बोलत होता. तो म्हणाला,’ स्टार्सबद्दल रोज नवी अफवा असते. मी ती ऐकतो आणि काही शिकतोही. पण फार गांभीर्यानं घेत नाही.’
सध्या रणवीर सिंग ‘बेफिक्रे’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. दीपिका आणि रणवीरच्या अफेअरबद्दल तर जगजाहीरच आहे. मग लग्नाचा विषय निघाल्यावर तो असं का बोलला, याबद्दलच आता उत्सुकता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv