29 जुलै : बेळगाव जिल्ह्यात येळ्ळूर गावात मराठी भाषकांवर लाठीमार झाल्यानंतर आजही सीमावासीय पोलिसांच्या दहशतीखाली आहेत. येळ्ळूर मधला महाराष्ट्र राज्याचा फलक पोलिसांनी काढल्यानंतर बेळगाव जिल्ह्यातल्या उचगाव, आंबेवाडी, बाची, मन्नूर, कंगराळी या गावांमध्ये महाराष्ट्र राज्याचे फलक उभारण्यात आले होते.
पण आता हायकोर्टाच्या आदेशाचे कारण पुढे करत हे फलक हटवले जात आहे. या सगळ्याच गावांमध्ये पोलिसांची दहशत आहे. त्यामुळे इथले नागरिक तणावाखाली आहेत. तर दुसरीकडे येळ्ळूर गावात अजूनही सातशे पोलीस तैनात असून या ठिकाणी आज रात्रीपर्यंत 144 कलम कायम ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, जवामबंदीच्या आदेशामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होऊ शकली नाही. बेळगाव शहरातील जमाव बंदी ईद निमित्त हटवण्यात आली. त्यामुळे बेळगाव आणि निप्पाणी या शहरातील व्यवहार सुरळीत चालू आहेत. रविवारी येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलकांवर कर्नाटक पोलिसांनी सीमाभागातील गावकर्यांवर अमानुष लाठीमार केला होता. पोलिसांनी महिला, वृद्ध, तरुणांवर बेफाम लाठीमार केला होता. एवढेच नाहीतर पोलिसांनी घरात घुसून लाठीमार केला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++