01 ऑगस्ट : बेळगावात आज शिवसेनेचे आमदार आणि कर्नाटक पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली आणखी दोन नेत्यांचे शिष्टमंडळ आज बेळगावमध्ये पोहोचलं. हे शिष्टमंडळ बेळगावमधील मराठी भाषकांच्या व्यथा जाणून घेण्याआधी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र कर्नाटक पोलिसांनी शिवसेनेच्या आमदारांना पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं.
दुसरीकडे, शिवसेना शिष्टमंडळाला विरोध करण्यासाठी बेळगावात कन्नड संघटनांनी आंदोलनं, निदर्शनं आणि घोषणाबाजी केली. यावेळी कन्नड संघटनेचे नेते वाताल नागराज यांच्यासह 6 नेत्यांना बेळगाव विमानतळावर अटक करण्यात आली. तर शिवसेना शिष्टमंडळाला येळ्ळूरमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे शिवसैनिक जास्तच आक्रमक झालेे. यावेळी कर्नाटक पोलीस आणि शिवसेनेमध्ये बाचाबाचीही झाल्याची माहिती मिळतीये. दरम्यान या शिष्टमंडळाचा पाठलाग करत असतानाच कर्नाटक पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. पहिल्या रेल्वे गेटजवळ पोलिसांची गाडी पलटी झाली.
याचाच निषेध म्हणून शिवसेनेने कोल्हापूर बंदची हाक दिलीय. आमदार राजेश क्षीरसागर यांनी या बंदचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कर्नाटक पोलिसांचा निषेध करत शिवसैनिक आज कोल्हापुरात रॅलीही काढणार आहेत. चंदगड तालुक्यातल्या शिनोली फाट्यावर शिवसेनेनं कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत दहन केलं. दिवाकर रावते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++