30 ऑक्टोबर : भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा उद्या (शुक्रवारी) 31 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या शपथविधी सोहळयासाठी महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून भाजपचे कार्यकर्ते येणार आहेत. पण कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नेहमीप्रमाणे ‘हात धुऊन’ घेतले आहे. अव्वाच्या सव्वा दराने मुंबईसाठी तिकिटांची विक्री होत आहे तर विमानाच्या तिकिटाचे दरही गगनाला भिडले आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘होम टाऊन’ नागपूरमधून पाच हजार भाजप कार्यकर्ते येणार आहेत. मात्र इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाल्यामुळे रेल्वे, विमान आणि बसचे तिकीटं उपलब्ध नाहीत. शिवाय 2 ते 3 हजारांपर्यंत मिळणारे विमानाचे तिकीटही तब्बल 20,000 रूपयांपर्यंत गेले आहे. तसंच रेल्वेचे वेटिंग कोणत्याही सणाचे, सुट्ट्यांचे दिवस नसतानाही 300 पर्यंत गेलं आहे. याव्यतिरीक्त कुठलाही वाहतुक पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक कार्यकर्ते खाजगी वाहनाने मुंबईकडे निघाले आहेत. या शपथविधी सोहळ्यात इतर आमदारही मंत्रिमंडळासाठी शपथ घेणार आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही या सोहळ्यासाठी निघाले आहेत. काहींनी पुण्यावरुन मुंबईकडे येण्याचा मार्ग निवडला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++