JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

27 जुलै : कर्नाटक पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सांगितलं. कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधल्या ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करणं थांबवावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बेळगावमध्ये पुन्हा उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक कर्नाटक पोलिसांनी रविवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात पुन्हा काढून टाकला आहे. या घटनेनंतर येळ्ळूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी मराठी भाषिक नेत्यांची धरपकड सुरू केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

cm news belgoa 27  जुलै :      कर्नाटक पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सांगितलं. कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधल्या ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करणं थांबवावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बेळगावमध्ये पुन्हा उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक कर्नाटक पोलिसांनी रविवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात पुन्हा काढून टाकला आहे. या घटनेनंतर येळ्ळूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी मराठी भाषिक नेत्यांची धरपकड सुरू केली. कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिक लोकांवर अमानुष लाठीमार केला. लोकांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. महिलांनाही पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांनी आपले पैसे आणि मोबाईलही नेल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. 50 जणांवर लाठीमार केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या