11 जुलै : मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून रेल्वे वाहतुकही विस्कळीत झाली आहे. सकाळी कामासाठी बाहेर पडणार्या चाकरमान्यांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.
मध्य रेल्वे वाहतूक15-20 मिनिटं उशिराने धावत आहेत तर हार्बर लाईन पुर्णपणे ठप्प आहे. काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर रस्त्यावरही काही ठिकाणी पाणी साचलं आहे. लालबाग , परेल , हिंदमाता, माहीम जंक्शन, कुर्ला आणि चेंबूर परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसामुळे नवी मुंबईतील मसाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील सर्व जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण किनारपट्टीवर येत्या 48 तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++