14 जुलै : मुंबईत वाय-फायवरून शिवसेना मनसेत वाद सुरूच आहेत. शिवाजी पार्क वाय-फाय प्रकल्पानंतर आता विलेपार्ले मध्ये मनसेने मोफत वाय-फाय सुरू केलं आहे. विलेपार्ले भागात हनुमान रोडवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे या भागात मनसेचा एकही नगरसेवक नाही, पण इथं मनसेचा दबदबा असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर वाय-फायचा घाट घातला गेला आहे. ‘हे लोकांचं काम आहे आणि ते कोणीही केलेलं चांगलं’ असे राज ठाकरे उद्घाटनाच्या वेळी म्हणाले. पण हा प्रकल्प अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कमध्ये वाय-फाय लावण्यासाठी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी खोदकाम सुरू केलं होतं. पण पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला होता आणि आता विलेपार्लेच्या या नव्या वाय-फायचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++