09 ऑगस्ट : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या जागेवर त्यांची मुलगी आमदार पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या मागणीला जोर येऊ लागला होता. पंकजा मुंडे यांनी आता आपण मंत्रिमंडळात जाण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे केंद्रात जाणार की राज्यातच थांबणार याबद्दल चर्चा होती.पंकजा यांनी खासदारकी लढवावी आणि त्यानुसार त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असून आपणही केंद्रात जाण्यासाठी तयार असल्याचं आमदार पंकजा मुंडे यांनी बीड इथं सांगितलं. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++