JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मान्यता रद्द झालेल्या 917 शाळांतल्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला

मान्यता रद्द झालेल्या 917 शाळांतल्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला

31 जुलै : मुंबईतल्या 583 खासगी शाळांच्या मान्यतेला मिळालेली मुदतवाढ संपली आहे. या शाळांनी शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून या शाळांना वाढीव मुदत नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांचं भवितव्य टांगणीवर लागलं आहे. काही दिवसांपूर्वी IBN लोकमतने खासगी अनुदानित 334 शाळांची यादी दाखवली होती. याच माहितीवर अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात अशा शाळा चालवता येणार नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image acs_on_school_fee_300x255.jpg 31 जुलै : मुंबईतल्या 583 खासगी शाळांच्या मान्यतेला मिळालेली मुदतवाढ संपली आहे. या शाळांनी शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून या शाळांना वाढीव मुदत नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांचं भवितव्य टांगणीवर लागलं आहे.

काही दिवसांपूर्वी IBN लोकमतने खासगी अनुदानित 334 शाळांची यादी दाखवली होती. याच माहितीवर अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात अशा शाळा चालवता येणार नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे आता मुंबईत मान्यतेला मुदतवाढ न मिळालेल्या शाळांची एकूण संख्या 917 झाली आहे. ज्यामधून तब्बल 4 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विशेष म्हणजे राज्य सरकारचा शिक्षण विभाग एकीकडे मुदतवाढ नसलेल्या शाळा चालवता येणार नाही असं म्हणत आहे तर दुसरीकडे या सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी वेळेची मर्यादाही घालून दिलेली नाही. शासनाने खरंतर या सर्व खासगी शाळांकडून दंड वसूल करायला हवा. पण त्याकडे ही पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. मान्यता नसलेल्या कॉलेजमधून पदवी मिळवल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांवर विरोधक आज आक्षेप घेत असतील तर उद्या अशाच पद्धतीचा आक्षेप लहान मुलांच्या शिक्षणावरही केला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या